देवळा प्रतिनिधी : तालु्यातील माळवाडी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ माळवाडी व फुले माळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने फुले – आंबेडकर जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला. महोत्सवात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून फुले, आंबेडकरांच्या जीवनावरील चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान परीक्षा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्यात. तसेच स्लो मोटर सायकल स्पर्धा घेण्यात आली व मोटर सायकल स्लो चालवण्याचे फायदे सांगण्यात आले.
१४ एप्रिल रोजी सोहळ्याची सांगता
यावेळी देवळा तालुक्यातील वाखारी च्या स्नेहल दयाराम आहेर यांची भारतीय वायू सेनेत अधिक्षक पदावर नियुक्ती झाल्याने त्यांचा आणि माळवाडी येथील पार्थ प्रेमानंद बागुल यांच्या लघुपटाला भारतीय चित्र साधना हा प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. व बाल कलाकार सोहम दिलीप बागुल याचे अभिनंदन करण्यात आले.
महोत्सवात घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी श्री. एस. टी. ठोके सर ( कन्या विद्यालय, देवळा ) हे होते. याप्रसंगी म. फुले विद्यालय माळवाडी चे मुख्याध्यापक श्री. एस सोनजे सर, श्री. गुप्ते सर, श्री. मोरकर सर, चित्रकला शिक्षक श्री. पाटील सर, जि. प. शाळा माळवाडी च्या मुख्यापिका सौ. आहेर मॅडम, सौ. खैरनार मॅडम, सौ. भामरे मॅडम ( जिजामाता कन्या विद्यालय देवळा ), माळवाडी गावाचे सरपंच श्री. शिवाजी बागुल, ग्रामसेवक देवरे भाऊसाहेब, फुले माळवाडी च्या सरपंच सौ. उषाताई शेवाळे, ग्रामसेविका सौ. सोनार मॅडम, पोलिस पाटील सौ. वाघ मॅडम.
वाचनालय माळवाडी अध्यक्ष बळवंत काका बागुल, म. फुले मंडळाचे अध्यक्ष साहेबराव अण्णा बागुल, मा. उपसरपंच श्री. निकेश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी श्री. हेमंत बागुल, श्री. रमेश बागुल, श्री. सुशील बागुल, श्री. प्रेमानंद बागुल, श्री. अनिल गोसावी, श्री. सुनील वाघ, श्री. प्रमोद पवार, श्री. तात्याभाऊ भदाणे आदी अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ज्ञानेश्वर बागुल यांनी केले.
कार्यक्रमासाठी देणगीदार म्हणून..
श्री. जिभाऊ मोतीराम बच्छाव (सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी), श्री. हिरा काका शेवाळे, श्री. रघुनाथ निंबा बागुल, श्री. जालिंदर निंबा बागुल, श्री. सुरेश तुळशीराम बागुल, श्री. तात्याभाऊ महादू बागुल, श्री. बळवंत बागुल, श्री. जयराम सोनवणे, श्री. नामदेव रमण बागुल, श्री. खंडू डांबले, मच्छिंद्र आहिरे (ग्रा. पं. सदस्य) ग्रामसेवक श्री. देवरे भाऊसाहेब आदी लाभले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम