द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : माळवाडी, फुले माळवाडी पाणी पुरवठा योजने साठी जि.प.सदस्या नूतन आहेर यांनी ग्रामपंचायत, सभामंडप माळवाडी येथे बैठक घेऊन संबंधितांशी चर्चा केली महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद अंतर्गत जल जीवन मिशन या महत्त्वकांक्षी पाणी पुरवठा योजनेच्या कृतीआराखड्यात वाखारी जि. प. गटातील ८ गावांचा समावेश झाला असून त्यात माळवाडी, फुले माळवाडी या दोन्ही गावाचा देखील समावेश करण्यात आल्याने येथील रहिवाशांसाठी ही योजना वरदान ठरणार असून गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागणार असल्याने सदर योजना लवकरात लवकर कार्यान्वयित व्हावी यासाठी जि. प. सदस्या नूतन आहेर यांनी पाणीपुरवठा करणाऱ्या ‘उदभव विहिरीची’ जागा निश्चित करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर, सरपंच शिवाजी बागुल, मा. उपसरपंच यशोदाबाई बागुल, ग्रा.पं. सदस्य रिंकू जाधव, तुळशीराम बच्छाव, बापू बागुल, शकुंतला शेवाळे, सुरेखा बागुल, ताराचंद बागुल, हिरालाल शेवाळे, अशोक बच्छाव, सुशांत गुंजाळ, हेमंत बागुल, नितीन शेवाळे, सुरज अहिरे, अंजनाबाई कुवर, भाऊसाहेब बागुल, दिलीप शेवाळे, दीपक बागुल, मालती बागुल, गंगाराम माळी, निंबा खैरनार, दादाजी खैरनार, सतीश बागुल,ग्रामविकास अधिकारी संभाजी देवरे, अर्चना सोनार आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम