मालेगाव येथे दोघांवर गोळीबार अन कटरने वार करून केले रक्तबंबाळ

1
55

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : मालेगाव येथे दोघा तरुणांवर गोळीबार आणि कटरने वार केल्याची घटना घडली आहे.

गेल्या दहा दिवसांत मालेगाव मध्ये ही दुसरी घटना घडली आहे. लूटमार करण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळक्याने मोहम्मद अब्रार अताउर रहेमान आणि तबरेज शेख यांच्यावर हल्ला केला. यात एकाच्या मांडीत गोळी घुसल्याने आणि एकाच्या पाठीवर कटरचे वार करण्यात आल्याने ते रक्तबंबाळ झाले.

पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीतील स्टार हॉटेलजवळ ही घटना घडली. मोहम्मद अब्रार आणि तबरेज अहमद हे बिहारचे तरुण फेअर कंपनीत काम करतात. हे दोघेही रूममधून बाहेर पडले असता, त्यांच्यावर टोळक्याने चाल करून येत पैशांची मागणी केली. मात्र या दोघांनी प्रतिकार केल्याने त्यांच्यावर टोळक्याने हल्ला केला. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी म्हाळदे शिवारात देखील गोळीबाराची घटना घडली होती. आणि अवघ्या दहा दिवसांत ही दुसरी गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here