द पॉईंट नाऊ ब्युरो (मालेगाव) : मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिरासह दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात जवळपास 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, DYSP जाधव यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वसंत पवार, अंमलदार पारधी तसेच सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, आयोजक, प्रायोजक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस मित्र, नागरिक यावेळी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम