मालविंदर सिंग म्हणता काश्मीर हा एक देश ; भारत पाकिस्तानने अतिक्रमण केले

1
21

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू हे सध्या अडचणीत आले आहेत. सिद्धू प्रदेशअध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सल्लागार नेमलेत त्यातील एका सल्लागारामुळे सिद्धूची चांगकी कोंडी झाली आहे. वादग्रस्त विधानांमुळे सिद्धू अडचणीत आला आहे.

पंजाब काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूचे सल्लागार मालविंदर सिंग माली यांनी वक्तव्य केलं की काश्मीर हा एक वेगळा देश आहे. माली म्हणाले होते की काश्मीर हा काश्मिरी लोकांचा देश आहे. 1947 मध्ये ब्रिटिशांनी भारत सोडला तेव्हा युनोच्या निर्णयाचे उल्लंघन करून काश्मीर देशाचे दोन तुकडे झाले. त्यावर पाकिस्तान आणि भारताने कब्जा केला होता. या वक्तव्यावरून काँग्रेसनेते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

या विधानांनंतर राजकारण तापले असून काँग्रेस पक्षातून देखील विरोध होऊ लागला आहे .  पंजाब चे सीएम कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तीव्र शब्दात फटकारले तर काँग्रेस नेते मनीष तिवारी  यांनी अशा लोकांना देशात राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी सोमवारी पक्षाच्या नेतृत्वाला सिद्धूच्या दोन सल्लागारांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यावर आत्मपरीक्षण करण्याची विनंती केली. त्याचबरोबर त्यांनी अशीही विचारणा केली आहे की असे लोक पक्षात असावेत जे जम्मू-काश्मीरला भारताचा भाग मानत नाहीत आणि ज्यांची प्रवृत्ती पाकिस्तान समर्थक आहे.

या वक्त्यावरून भाजपा सह सर्वच पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सल्लागारावर कारवाईची मागणी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

  1. अश्या चुतियां लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून नागरिकत्व काढून घेतले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here