देवळा प्रतिनिधी : मानव विकास परिषदेच्या देवळा तालुका महिला मार्गदर्शक पदी देवळा येथील जयश्री संतोष गुजरे यांची नियुक्ती करण्यात आली . परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख व महिला प्रदेशाध्यक्षा श्रीमती जयश्री अहिरे यांनी सौ गुजरे यांची नियुक्ती केली आहे .
नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, मानव विकास परिषद म्हणजे शोषित , श्रमिक, पोलिस कोठडीत मृत्यू , बेकायदेशीर अटक , शोषण , गुलामगिरी , दहशत , मागासवर्गीयांवर होणारा अन्याय त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयाकडून होणारी पिळवणूक , मानवी हक्काचे उल्लंघन , शासकीय अधिकाराचा गैरवापर ,भांडवलशाहीकडून पैशाच्या व सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणेचा स्वार्थासाठी होणारा वापर हे सर्व समूळ नष्ट करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांचे संवैधानिक मानवी हक्कासाठी परिषद प्रयत्नशील आहे .
सामान्य जनतेला न्याय , अधिकार मिळवून देण्याचा हा बुलंद आवाज आहे . सामाजिक बांधिलकी , निःस्वार्थवृत्ती आणि प्रमाणिकपणामुळे परिषदेला जनतेकडून प्रचंड समर्थन मिळत आहे . या महान कार्यात सहभागी होण्यासाठी सौ गुजरे यांची एका वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम