प्रविण आहेर प्रतिनिधी
चांदवड देवळा : येथील तहसील कार्यालय, कृषी विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय व इतर काही शासकीय विभाग खर्डे रोडवरील नवीन प्रशासकीय इमारतीत कार्यरत आहेत परंतु देवळा शहरापासून हे अंतर जवळपास तीन ते चार किलोमीटर आहे. त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना कागदपत्रे तसेच इतर कामानिमित्त ये-जा करण्यास मर्यादा पडतात. रिक्षा वा बससुविधा नसल्याने वाहन नसलेल्यांना पायीच चकरा माराव्या लागतात. या पार्श्वभूमीवर येथील माध्यमिक शिक्षक तसेच राज्यस्तरीय समुपदेशक व पर्यावरणमित्र असलेले सुनील आहेर यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनापासून म्हणजे रविवार (ता.१५) पासून सलग वर्षभर स्वतःच्या दोन सायकली, एक स्कुटी व एक चारचाकी वाहन मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठांना प्रशासकीय कामानिमित्त या कार्यालयात जायचे असेल आणि ज्यांच्याकडे वाहन नसेल त्यांनी सुनील आहेर सर यांच्या ९४२३२५५३०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी सायकल तर ज्येष्ठांना स्कुटी तसेच चारचाकी सीएनजी वर चालणारे वाहन उपलब्द असणार आहे. यापूर्वीही त्यांनी कोरोनाबाधित रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी वेळेवर ऍम्ब्युलन्स उपलब्द होत नसल्याने तसेच कुणी स्वतःचे खाजगी वाहन देत नसल्याची समस्या ओळखत आहेर यांनी आपले चारचाकी वाहन मोफत आणि चोवीस तास रूग्णसेवेकरिता उपलब्ध करून दिले होते. आहेर सर कोरोना योध्याच्या भूमिकेसह बालरक्षक समुपदेशक म्हणूनही कार्यरत आहेत
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
👍🙏