द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : कांद्यांची मोठी उलाढाल होत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील बसवंत बाजार समितीमध्ये (Pimpalgaon Baswant APMC) गेल्या दोन दिवसांपासून माथाडी कामगारांनी संप पुकारल्यामुळे लिलाव ठप्प झाले होते. मात्र आता हा संप संपला असून कामगारांनी आपल्या मागण्या मागे घेतल्या आहेत. मात्र कामगारांनी आता संप मागे घेतला असला तरी त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा संप केला जाईल अशी माहिती कामगारांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांद्याची मोठी उलाढाल होत असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून माथाडी कामगारांनी संप पुकारला होता. हा संप पुकारल्यामुळे लिलाव ठप्प झाले होते. आता हा संप मिटला असून उद्या सकाळी नऊ वाजेपासून लिलाव पूर्ववत होतील अशी माहिती पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षांनी दिली आहे.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत पंचक्रोशीसह जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शेतमाल विक्रीसाठी दाखल होत असतो. अचानक माथाडी कामगार टोळी दोनच्या कामगारांनी मंगळवार पासून काम बंदचा पवित्रा घेतल्याने पिंपळगाव बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प झाले होते. यामुळे कोट्यवधी रुपयाची उलाढाल ठप्प झाली होती.
३५० माथाडी कामगारांनी व्यापारी वर्गास कुठलीही पूर्व कल्पना न देता मंगळवार दुपारपासून वाढीव मजुरीसह (Increased wages) वाढीव वाराही मिळावी या प्रमुख मागण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारल्याने पिंपळगाव बाजार समितीतील लिलाव ठप्प झाले होते. दरम्यान, दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर उद्यापासून लिलाव सुरु होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम