नाशिक प्रतिनिधी : देवळा नगरपंचायत मधील राष्ट्रवादीची एन्ट्री तेथील सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारी असेल, भ्रष्टाचारावर लक्ष ठेवणारी असेल असे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित गोटु शिंदे व एशवर्या आहेर यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली, यावेळी शिंदे यांच्या पाठीवर थाप मारत भुजबळ यांनी हे गौरवोद्गार काढले.
देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाची सत्ता आली मात्र 17-00 चे स्वप्न अधुरे राहिले. राष्ट्रवादीच्या तिकिटावर पहिल्यांदा दोन नगरसेवक निवडुन आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव आहे. याच पार्श्वभूमीवर आज दोघ नगरसेवकांचा सत्कार भुजबळ यांनी केला. स्थानिक ठिकाणी राष्ट्रवादीत असलेला बेबनाव तसेच भाजपाची असलेली ताकद बघता दोघ उमेदवार निवडून आल्याने पालकमंत्री भुजबळ यांनी विशेष कौतुक करत विकास कामांची हमी दिली.
तालुक्यात जे जे विकासकामे करायची ते करा मागण्या करा तुम्हाला हवी ती मदत करू अशा शब्दात तालुक्यातील विकासाची हमी मंत्री भुजबळ यांनी दिल्याने नगरसेवक विकासात्मक ऊर्जा घेऊन परतल्याचे दिसले. दोघ नगरसेवक नगरपंचायत गाजवणार की हाजी हाजी करणार हा येणार काळच सांगेन, मात्र दोघ नगरसेवक हे पक्षनिष्ठेला मानणारे असल्याने राष्ट्रवादीचा दरारा सभागृहात दिसतो का हे बघणं महत्त्वाचे असेल.
या भेटी प्रसंगी जगदीश पवार, सचिन सूर्यवंशी चिंतामण आबा, दिलीप आहेर, शिरसाट साहेब, सुनील गंगाधर आहेर, दत्तू आहेर, जगन आहेर, महेंद्र आहेर आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम