माझ्या आयुष्यातील ही शेवटची राजकीय सभा ; उदयकुमारांची भावनिक साद

0
179

देवळा प्रतिनिधी : नगपंचायत निवडणुकीत उदयकुमारांनी एकूण चार सभा घेत समारोपाच्या सभेत भाजपा व राष्ट्रवादीला फैलावर घेत राजकिय आयुष्यातील सभेचा शेवट केला. भविष्यात कदाचित ही शेवटची राजकिय सभा असेल असे म्हणत देवळ्याचा विकास करायचा की भकास हे जनतेने ठरवावे असे आवाहन आहेर यांनी केले.

भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर हेच उदयकुमारांच्या निशाण्यावर असल्याने आरोपांच्या अनेक फैरी झाडल्या, मी चुकीचा असेल तर केदा आहेरांनी मुद्द्यांचे खंडन करावे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जनतेच्या समोर यावं अन माझ्या प्रशांची उत्तरे द्यावेत असे थेट आवाहन केदा आहेर यांना उदयकुमारांनी दिले.

भाजपाचा उमेदवार पडला तर या वॉर्डाचा विकास होणार नाही अस सांगता मात्र त्यांना मी आव्हान देतो हिम्मत असेल तर मी आणणारा निधी अडवून दाखवा, पालकमंत्री भुजबळ, मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोट्यवधींचा निधी या वॉर्डात आणला नाही तर ‘निंबाजी आहेर’ हे नाव लावणार नाही. धमक्या कोणाला देता अश्विनी निवडणार अन या वॉर्डात कोट्यावधींचा निधी आणणार लिहून ठेवा अन काय असेल ताकद लावा न अडवून दाखवा तेव्हा समजेल आहेत तुमच्यात दम, पोकळ धमक्या बाजारू नेत्यांना द्या ,अपघाताने झालेल्या नेत्यांना द्या मला नका असा इशाराच उद्यकुमारांनी दिला.

जितेंद्र आहेर यांनी पक्षांतर करतांना तुम्हाला गृहीत धरले, साधे विचारले देखील नाही, हे ‘रामपाहऱ्यात’ येता म्हणून त्यांना मतदान करा असे सांगणारे भंगट तुम्हाला भेटतील पण तुम्ही यांना भुलू नका. मला सांगा मी रात्रभर येथे बसतो, या बावळटपणाला अर्थ नाही. यांना काम करायचे असतील तर जिल्हानेते शनिवारी येतील तोपर्यंत वाट बघावी लागेल. मात्र अश्विनी तुमच्यासाठी सदैव नगरपंचायतीत असेल असे म्हणत हल्लाबोल चढवला.

राष्ट्रवादीचे नेते योगेश आहेर यांना शुभेच्छा देतांना उदयकुमार म्हणाले, आबांना दीर्घायुष्य मिळो, आबांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत अन अश्विनी निवडून येवो असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पसरली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here