‘माझा भाऊराया’ रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला

0
23

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : भाग्यदीप म्युझिक व बंधन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्षा बंधन या सणाचे औचित्य साधून बहिण भावाच्या अतूट नात्यावर चांगली अशी स्टोरी “माझा भाऊराया” या अल्बम सॉंग मध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या गाण्याचे लेखक, गायक कुणाल पवार यांनी केलेले आहे, तसेच , दिग्दर्शन/ स्टोरी प्रदीप भोई यांनी केले असून योगेश ठाकूर यांनी चित्रीकरण केलेले आहे.

माझा भाऊराया या सुंदर गीतांमध्ये गोरी गोरी पान फेम साधना ठाकूर यांनी लिड एक्ट्रेस म्हणून काम केला आहे. व डार्लिंग चित्रपट चित्रपटातील अभिनेता परिक्षित लंगडे यांनी साधना ठाकूर यांनी ही भूमिका साकारली आहे. तसेच या गीताचे शब्द व गायन कुणाल पवार व सिद्धी बघे यांनी केले असून त्या गीताला संगीत बद्ध प्रमोद महाजन यांनी केले आहे. सहायक अभिनय म्हणून रिया चिंते, इम्रान बिस्मिल्ला, प्रवीण लाड, श्रीकांत चोधरी,भानुदास जोशी, संदीप मोरे, यांनी कार्य केले आहे.

हे गाणं आपल्याला युट्युब च्या माध्यमातून भाग्यदीप म्युझिक या चैनल वर पाहण्यासाठी मिळणार आहे. गेल्या दोन महिन्या आधी भाग्यदीप म्युझिक या यूट्यूब चैनल वर शेतकरी आत्महत्या वर आधारित ‘देवा रं’ या सुंदर गीताने अक्षरशा मराठी चित्रसृष्टीतील अभिनेत्यांनी देखील या गाण्याचं कौतुक केलेलं होतं त्या लागोपाठच रक्षाबंधन साठीच हे नवीन गीत आम्ही रसिक प्रेक्षकांसाठी सादर केलेलं आहे तरी नेहमीप्रमाणे रसिकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा आमची पूर्ण टीम करीत आहे. व आपण सर्व रसिकांनी जास्तीत जास्त लोकांत पर्यंत हे गीत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा व आमचं मनोबल वाढवावे आणि यापेक्षाही नवीन सुंदर अप्रतिम स्टोरी व गीत आपल्या समोर सादर करण्यासाठी रसिक प्रेक्षकांची साथ हवी हीच अपेक्षा भाग्यदीप म्युझिक व बंधन प्रोडक्शन टीम करीत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here