माझा नवरा जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा मी माझा अर्धा कुंकू पुसून टाकते…

0
13

द पॉईंट नाऊ ब्युरो : देवळा नगरपंचायत निवडणुकीत शिवसंग्रामच्या वॉर्ड क्रमांक 11 च्या उमेदवार अश्विनी उदयकुमार आहेर यांच्या प्रचारार्थ देवळा येथे सभा पार पडली.

यात अश्विनी आहेर बोलतांना म्हणाल्या माझा नवरा जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हाच मी माझा अर्धा कुंकू पुसत असते…. कारण नवरा घरी परत येईल की नाही हे सांगता येत नाही, देवळा शहरात दहशत आहे. राखीव जागा झाली म्हणून नेत्यांचा इतका त्रागा का ? नगरपंचायतचा कारभार हा पतीने नव्हे तर स्वतः महिलेने चालवला पाहिजे. महिलांचे हक्क हिरावू नका, तुमचा आवाज उठवण्यासाठी मी सक्षम आहे. तुमचा आवाज मी बनणार आहे. या शहरात महिलांना स्वछता गृह नाही, काय विकास केला यांनी. महिलांना स्वछता गृह बांधू शकले नाही, यापेक्षा दुर्दैवी काय असणार, अग्निशामक दलाची गाडी नाही. काही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदारी कोण घेणार. घरातील करता मुलगा बिघडवला जातोय. महिलांनी पुढाकार घ्या यांच्या भूलथापांना उलथवून लावा. सक्षम विरोधक पाहिजे असेल तर मला तुमचा पाठिंबा द्या.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here