महिला सुरक्षा संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी बच्छाव तर सचिव पदी वनिता शिंदे यांची नियुक्ती

0
44

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा महिलांवरील अन्याय अत्याचार, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार अशा महिलांच्याअनेक समस्याचे योग्य प्रकारेनिवारण करणाऱ्या महिला सुरक्षा संघटनेच्या देवळा तालुका अध्यक्ष पदी जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण समिती सभापती उषाताई शंकर बच्छाव यांची निवड झाली आहे.

तर देवळा तालुका सचिव म्हणून वनिता संतोष शिंदे,देवळा तालुका उपाध्यक्ष म्हणून वैशाली कौतीक खोंडे ,तालुका सहसचिव अनिता विलास शिंदे,जनसंपर्क प्रमुख रुपाली गणेश जाधव,तर देवळा तालुका सोशल मीडिया सचिव म्हणून योगिता सचिन सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.

महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य राज्याचे प्रदेश अध्यक्ष किसनराव काशीद पाटील,महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य सचिव सिमाताई पाटिल यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. या निवडीचे माजी आमदार शांताराम तात्या आहेर , पंडितराव निकम, यशवंत शिरसाठ, नूतन आहेर, योगेश आहेर , सुनील आहेर, दिलीप आहेर ,चिंतामण आहेर, अतुल आहेर, संतोष शिंदे, सचिन सूर्यवंशी आदींनी अभिनंदन केले आहे.दरम्यान ,माजी समाज कल्याण समिती सभापती उषाताई बच्छाव यांनी मुख्याध्यापिका, महिला दक्षता समिती सदस्य, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष, शिक्षण समिती सदस्य जी प ,जिल्हा नियोजन समिती सदस्य, माजी सरपंच देवळा ग्रामपालिका ह्या ठिकाणी आपल्या कामकाजाचा ठसा उमटवला आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here