मुंबई प्रतिनिधी : शाळा सुरू झाल्यानंतर महाविद्यालय देखील खुली होणार आहेत, राज्यात करोनाची लाट असली तरीदेखील रुग्ण मात्र लवकर बरे होत आहेत. त्यामुळे राज्यातील शाळा सोमवार पासून सुरु करण्यात आल्या, तर दुसरीकडे लसीसाठी परवानगी दिलेल्या वयोगटातील विद्यार्थ्यांचे सुरु करण्यात येणार असल्याचे ट्विटरवरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
१ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरु करण्यात येतील. मात्र यावेळी करोना नियमांचे पालन करुन महाविद्यालये सुरु करावेत असे आदेश देण्यात आले आहेत.
ट्विटमध्ये सामंत म्हणाले, ‘दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या आदेशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे.
महाविद्यालयात येताना विद्यार्थ्यांचे लसीकरण केलेले असणे आवश्यक आहे. करोनामुळे गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झाले. आता करोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरणही (Vaccination) बऱ्यापैकी झाल्याने महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम