
देवळा : महालपाटणे(ता.देवळा) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत तेरा जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात होते.देवळा बाजार समितीचे संचालक दादाजी आहिरे व सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा देवपूरपाडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवाजी आहिरे यांच्या जय मल्हार पॅनेलने सर्व जागा जिंकून सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

तथापि देवळा पंचायत समितीचे माजी सभापती सुकदेव आहिरे यांच्यासह ९ उमेदवारांनी जाहीर पाठिंबा दिल्याने खरी लढत १३ विरुद्ध ४ अशीच झाली.केशव आहिरे यांच्या घरातील सर्व चारही उमेदवारांचा पराभव झाला. महालपाटणे, देवपूरपाडे रणादेवपाडे, गंगावाडी, बजरंगवाडी,बच्छाववाडी आदी गाव व वस्तीवरील ८१० पैकी ७१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांच्या उपस्थितीत निकाल जाहीर करण्यात आला.विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात दादाजी अहिरे(४४०) अध्यक्ष शिवाजी आहिरे(४४५) छबू भामरे (३८३) नानाजी आहिरे (३८९)विनोद ठाकरे(४३४)वसंत भाटेवाळ (४१३)उत्तम बच्छाव य (३६८)केदा सखाराम बच्छाव(४४७)संगीता सोनवणे (३९२)रामभाऊ जिभाऊ पाटील(३६०) साहेबराव देवरे(३८५)बाबुराव बच्छाव(३७५) गंगाबाई जोंधळे(३९७)
सर्व विजयी उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य किरण आहिरे, जितेंद्र (आबा)आहिरे, अशोक खैरनार, मन्सराम आहिरे, बाळू सावंत, नामदेव आहिरे,बंडू अहिरे, जिभाऊ सावंत, सागर खरोले,नानाजी गणपत ठाकरे,माजी चेअरमन मधुकर भाटेवाळ ,भाऊसाहेब ठाकरे,ग्रामपंचायत सदस्य गणेश बच्छाव, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब खरोले ,सदस्य योगेश आहिरे,अशोक खरोले ,वसंत सोनवणे,युवराज शेलार, योगेश ठाकरे,पी.एस.आय. समाधान कुमावत, विशाल आहिरे, सागर भाटेवाळ ,ईश्वर आहिरे, मनोज भाऊ ठाकरे,नंदू ठाकरे, मच्छिंद्र सावंत, कौतिक बच्छाव, युवराज आहिरे,दादा जोंधळे,श्याम ठाकरे, प्रवीण सोनवणे,दीपक अहिरे,सचिन अहिरे, आबा बच्छाव, चेतन भामरे,दिनेश सावंत,चेतनराज चित्ते, विक्रम पवार,भुरा गांगुर्डे, आदींसह महालपाटणे ग्रामस्थ मंडळी,शिवराज मित्र मंडळ,केदा(नाना)आहेर आधार फाउंडेशन महालपाटणे,देवपूरपाडे,रणादेव पाडे गावातील नागरिक उपस्थित होते.नवनियुक्त संचालकांनी मतदारांचे आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम