महालपाटणे विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी शिवाजी अहिरे तर उपाध्यक्ष पदी नानाजी अहिरे यांची बिनविरोध निवड

0
37

देवळा : तालुक्यातील महालपाटणे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी जय मल्हार पॅनलचे शिवाजी दोधा अहिरे तर उपाध्यक्ष पदी नानाजी भागा अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली . महालपाटणे विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली .

महालपाटणे विकास सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी अहिरे , उपाध्यक्ष नानाजी अहिरे समवेत संचालक मंडळ आदी (छाया -सोमनाथ जगताप )

यात जय मल्हार पॅनलने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे . आज मंगळवारी (२४) रोजी यक संस्थेच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडनुक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक सूरज पोटे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती . यावेळी अध्यक्ष पदासाठी शिवाजी आहिरे ,उपाध्यक्ष पदासाठी नानाजी आहिरे यांचा प्रत्येकी एक एक अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .यावेळी सचिव विलास ठाकरे, जय मल्हार पॅनलचे दादाजी भागा अहिरे, छबु(आबा)भामरे, उत्तम गंगाधर बच्छाव, विनोद ठाकरे, वसंत भाटेवाल,गंगाबाई जोंधळे, संगिता सोनवणे, केदा सखाराम बच्छाव,बाबुराव त्रंबक बच्छाव, साहेबराव देवरे उपस्थित होते , नूतन पदाधिकाऱ्यांचे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष केदा आहेर , नानाजी ठाकरे, सुपडू(सर)अहिरे, बाळासाहेब खरोले, बाजीराव ठाकरे, सरपंच दिलीप अहिरे, उपसरपंच शांताराम अहिरे, प्रवीण सोनवणे, कोतवाल महेश खरोले, किरण खैरनार, डी के सर, ,अमृत जोंधळे,सोनवणे वकील,दीपक अहिरे, जितू आबा ,शरद अहिरे,दिनेश सावंत आदींनी अभिनंदन केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here