महालपाटणे गावात आरोग्य उपकेंद्र सुरू करा ग्रामस्थ आक्रमक

0
5

देवळा : महालपाटणे गावात आरोग्य उपकेंद्र उपलब्ध करून घ्यावे ,अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य काजल खरोले यांनी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांचे स्वीय सहाय्यक मनोज बेलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे .

महालपाटणे गावात आरोग्य उपकेंद्र राष्ट्रीय बँकेची शाखा उपलब्ध करुन द्यावी या मागणीचे निवेदन मनोज बेलदार यांना देताना काजल खरोले किरण अहिरे सागर खरोले आदी छाया सोमनाथ जगताप

निवेदनाचा आशय असा की , तालुक्यातील महाल पाटणे हे तीन चार हजाराच्या वर लोकसंख्या असलेले गावं असून, बाजार पेठेचे गाव आहे . गावांत आरोग्य उपकेंद्र नसल्यामुळे गोर गरीब जनतेची गैरसोय निर्माण झाली आहे .त्याच बरोबर गावात राष्ट्रीय कृत बँकेची शाखा देखील सुरू करण्यात यावी ,अशी मागणी निवेदनात केली आहे . येथील नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी देवळा ,सटाणा ,मालेगाव आदी ठिकाणी जावे लागत असून, यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे . यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण अहिरे , सागर खरोले , उपसरपंच शांताराम अहिरे,,बाळासाहेब खरोले, अभिमन अहिरे, सरपंच किरण पाटील, भाऊसाहेब अहिरे, वसंत भाटेवाल, उत्तम बच्छाव, अशोक खरोले, मॅचिंद्र शेलार, रवींद्र खरोले , निलेश खरोले, शरद कर्डीवाल , शरद भाटेवाल ,बापूजी घोडले, हेमंत खरोले, नाना नारोळे, चंद्रशेखर नाना, भाऊसाहेब सांखोडे, चिकू अहिरे, सुभाष भाटेवाल, दिलीप खरोले, मुन्ना देवरे, गावनजी बंदरे, आदी उपस्थित होते .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here