प्रवीण आहेर
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : महाराष्ट्र बटालियन ७ एन.सी.सी नाशिकचे दि. २१ ते ३० ऑक्टों. १० दिवसांचं वार्षिक प्रशिक्षण नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन ७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल ए.के सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरामध्ये कर्नल ए.के. सिंग यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. मा. मुख्यमंत्री शिष्यवृत्ती सार्जंट थोरात ऋतिक लक्ष्मण कर्मवीर रामरावजी आहेर कॉलेज देवळा व सी.एच.एम चौधरी सुभाष महेश पेठे हायस्कूल नाशिक. यांना प्रत्येकी १५०० शिष्यवृत्ती मिळाली.
बेस्ट कॅडेट अवॉर्ड मुंबई ग्रुप लेव्हल देवळा महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना मिळाले. बेस्ट कॅडेट प्रथम सार्जंट थोरात ऋतिक लक्ष्मण व दृतिय क्रमांक कॅडेट गुंजाळ सुदर्शन दत्तात्रेय व विद्यार्थीनींमध्ये प्रथम क्रमांक जे यु ओ आहेर अंजली सुनील विद्यार्थ्यांना मिळाला. प्रथम क्रमांक आलेल्यांना ४५०० ची शिष्यवृत्ती व दृतिय क्रमांक आलेल्यांना ३५०० ची शिष्यवृत्ती देण्यात आली.
कॅडेट वेल्फेअर सोसायटी शिष्यवृत्ती कॅडेट सुवर्णा देवराम घुगे पिंपळगाव महाविद्यालय व सी डी मेरी हायस्कूल नाशिक येथील ४ विद्यार्थ्यांना मिळाली. त्यामध्ये सार्जंट तुसे कृष्णा प्रकाश, सार्जंट प्रेम चंद्रकांत भालेराव, एल.सी.पी.एल काकड तेजस निलेश, कॅडेट पाटील हर्षल अशोक प्रत्येकी ६००० रुपयाची शिष्यवृत्ती मिळाली .
या दहा दिवसांच्या शिबिरामध्ये चालणाऱ्या अनेक घडामोडी तसेच डिफेन्स, मेडिकल, मॅप रिडिंग, फायरिंग कवायत, सायबर र्सेक्युरिटी, सिव्हिल डिफेन्स , राष्ट्रीय एकात्मता,रस्ता सुरक्षा , मुलींचे आरोग्य, मूल्यशिक्षण,पर्यावरण, यासारख्या अनेक विषयांची माहिती या शिबिरामध्ये दिली जाणार आहे व ड्रिल स्पर्धा, गार्ड ऑफ ऑनर स्पर्धा राइफल खोलने व जोडणे स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध खेळ स्पर्धा होणार आहे. शेवटच्या दिवशी विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देण्यात येणार आहे व उत्कृष्ट महाविद्यालयाला हेल्थ हायजिन अँड बेस्ट डिसिप्लिन या स्मृतिचिन्हाने सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रम ७ महाराष्ट्र बटालियन एन सी सी नाशिक कमांडिंग ऑफिसर कर्नल ए.के सिंग. प्रशासकीय अधिकारी कर्नल राकेश कौल व एच.पी.टी कॉलेजचे मेजर उगले, भोसला मिलिटरी महाविद्यालयचे मेजर विक्रांत कावले व लेफ्टनंट योगेश भदाणे, के.टी.एच.एम महाविद्यालयचे लेफ्टनंट शिंदे, देवळा महाविद्यालयाचे लेफ्टनंट बादल लाड, सीडीओ मेरी हायस्कूल चे एन.सी.सीअधिकारी राठोड उपस्थिती लावली. ७ महाराष्ट्र बटालियन येथील पी.आय.स्टाफ सुभेदार सचिन पाटील , सुभेदार हरीश भाई वानिया, सुभेदार सागर पवार, सुभेदार दादा नलवडे, नायब सुभेदार बाळासाहेब वाबळे, बी. एच.एम गोरक्षनाथ कुटे, सी.एच.एम कुमार लिंगायत, सी.एच.एम. तारे भालचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर चालणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन लेफ्टनंट बादल लाड यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम