महाराष्ट्र पूर्वपदावर निर्बंध हटवले ; महाराष्ट्र कोरोनामुक्त

0
13

कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने सर्व निर्बंध उठवले आहेत. आता गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 183 नवीन कोविड रुग्ण आढळले असून 1 मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. हे पाहता महाराष्ट्र मंत्रिमंडळाने एक मोठा निर्णय घेतला असून त्यामध्ये 2 एप्रिलपासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले जाणार आहेत असे सांगितले आहे. गुरुवारी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळात हा निर्णय एकमताने घेण्यात आला असून त्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना महामारीमध्ये कोविड बाधित रुग्णांमध्ये महाराष्ट्र हे सर्वाधिक प्रभावित राज्य होते.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोविड बाधित 183 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 219 कोविड बाधित रुग्ण बरे झाले असून 1 मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रातील एकूण सक्रिय प्रकरणांबद्दल बोलायचे झाले तर ९०२ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे निर्बंध हटवले असतील, पण तरीही मास्क घालणे अनिवार्य असल्याचे सरकारने स्पष्टपणे सांगितले. यासोबतच कोविड नियमांचेही पालन करावे, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. महाराष्ट्रात कोविडचे निर्बंध हटल्यानंतर आता बाजारातही बऱ्यापैकी वर्दळ पाहायला मिळणार आहे. कोरोनाचे सर्व नियम हटवल्याने आता महाराष्ट्रातही सण उत्साहात साजरे होणार आहेत. कारण काही दिवसांतच यंदाचा गुढीपाडव्याचा रॅली निघणार असून रमजानच्या सणात बाजारपेठ फुलून जाणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here