द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्रात मागील काही दिवसांत घडलेल्या जाळण्याच्या घटनांनी महाराष्ट्र पूर्णतः हादरला आहे. नुकतेच नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात तरुणाला जाळण्याच्या घटनेनंतर आता अमरावती जिल्ह्यातही पतीने आपल्या पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे
अमरावतीच्या मेळघाटातील धारणी तालुक्याच्या बैरागड येथे घरातील कौटुंबिक वादामुळे नासिर शेख गफूर याने आपल्या पत्नीच्या अंगावर इंधन टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. आरोपी नासिरने पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केल्याने पत्नी 83 टक्के भाजली असून, तिची प्रकृती गंभीर आहे.
पती आणि पत्नीमध्ये बहुतांश वेळा वाद होत असतात. मात्र झालेला वाद आणि राग-रुसवा का काही वेळेपुरताच असतो. परंतु, अमरावती जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम