‘महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर सरकारचा आदेश मानावाच लागेल’

0
37

द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर सरकारचा आदेश पाळावाच लागेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने दुकानांना मराठीत पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याविरोधात व्यापारी संघटनेने दाखल केलेल्या याचिकेस फेटाळतांना उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारने नुकताच महाराष्ट्रातील सर्व छोट्या – मोठ्या दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात हा आदेश दिला होता. त्याविरोधात व्यापारी संघटनेने याचिका दाखल केली होती. या याचिकेस न्यायालयाने फेटाळून लावतांना संघटनेला 25 हजारांचा दंड देखील ठोठावला आहे.

महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करायचा असेल, तर सरकारचे म्हणणे मान्य करावेच लागेल. असे म्हणतांना न्यायालयाने सरकारने पाट्यांवर मराठी भाषेसोबत इतर भाषा वापरण्यास मनाई केलेली नाही. असे देखील म्हणत व्यापारी संघटनेची याचिका फेटाळून लावली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here