द पॉईंट नाऊ ब्युरो : देशात इंधन दरवाढीने कळस गाठला आहे. पेट्रोल चे दर 117 रूपयांवर जाऊन पोहोचले तर डिझेल 100 रुपयांच्या वर गेले. महाष्ट्रातील सरकारने त्यात आता CNG आणि PNG दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या इंधनाच्या वाढत्या दरांनी सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वाहन चालवणे परवडेनासे झाले आहे. मात्र आता CNG वर चालणाऱ्या वाहनांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात नैसर्गिक वायुवरील व्हॅट राज्य शासनाने 13.5 टक्क्यांवरून 3 टक्के केल्यानंतर आता CNG आणि PNG पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने CNG आणि PNG दरात 6 आणि 3.50 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणास्तव मुंबईत CNG 60 रुपयांपर्यंत आणि PNG 36 रुपयांपर्यंत स्वस्त झाला आहे.
महाराष्ट्र हे इंधनाद्वारे सर्वाधिक कर वसूल करणारे राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल करात कपात करण्यात आलेली नाही. यामुळे सामान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. CNG आणि PNG जरी कमी झाले असले, तरी पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार, याची सामान्य जनता वाट पाहत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम