भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ आकाश आणि हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, सांगली, कोल्हापूरसह अनेक ठिकाणी आकाशात ढग दिसतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी पावसाचे थेंबही पडू शकतात. त्यामुळे तापमानात घट नोंदवली जाणार आहे. तसेच उष्णतेपासून दिलासा मिळेल. मात्र, विदर्भात अजूनही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. याशिवाय राज्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक बहुतांशी मध्यम किंवा समाधानकारक श्रेणीत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये मंगळवारी हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.
मंगळवारी मुंबईत कमाल तापमान 34 तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. अंशतः ढगाळ आकाश अपेक्षित आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत 78 वर नोंदवला गेला.
पुणे
पुण्यात कमाल तापमान 39 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथेही दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 173 वर नोंदवला गेला.
नागपूर
नागपुरात कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाशात ढग दिसू शकतात. हवेचा दर्जा निर्देशांक 67 आहे, जो ‘समाधानकारक’ श्रेणीत येतो.
नाशिक
नाशिकमध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण दिसून येईल. हवेचा दर्जा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत 68 आहे.
औरंगाबाद
मंगळवारी औरंगाबादमध्ये कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील. मध्यम श्रेणीतील हवेचा दर्जा निर्देशांक 109 आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम