महाराष्ट्रात चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणांत वाढ

0
84

पोर्नोग्राफी हा एक भयंकर आणि घृणास्पद प्रकार आहे. आणि त्यात चाईल्ड पोर्नोग्राफी हा एक प्रकार. महाराष्ट्रात गेल्या काही कालावधीत चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पोलीस यंत्रणेद्वारे सांगण्यात आले आहे.

मुलांच्या अश्लील चित्रफिती तयार करणे, त्या इंटरनेटवर अपलोड करणे या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात 210 हुन अधिक चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरण गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आणि यात 100 हुन अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
सध्या पोर्नोग्राफी प्रकारांवरून मोठ्या प्रमाणावर रणकंदन माजले आहे. त्यात लहान मुलांना देखील अशा प्रकारे सामावले गेले असल्याने, हा भयंकर प्रकार धक्कादायक आहे.

चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधित ध्वनिफिती प्रसार करणे, बघणे हा देखील रक गुन्हा आहे. आणि या प्रकरणांमध्ये होणारी वाढ ही चिंता वाढवणारी आहे.
आपली मुले मोबाईल वापरत असतांना त्यांच्याकडे देखील पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांनी हातात मोबाईल घेतल्यानंतर ते काय आणि कसा वापर करत आहेत त्याकडे पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळ्या सक्रिय असल्याचे देखील समोर आले होते. पोलिसांद्वारे कारवाई करण्यात येत असली, तरीही ही प्रकरणे वाढतच असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
गरीब लोकांच्या मुलांचा देखील पैशांचे आमिष दाखवून गैरवापर केला जात असल्याचे समोर आले होते. लहान मुलांशी लैंगिक चाळे करणे, त्यांच्या अश्लील चित्रफिती तयार करणे, त्या इंटरनेटवर टाकणे अशा प्रकरणांमध्ये सदोदित वाढ होत असल्याने, चिंता व्यक्त केली जात आहे.

चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात चाईल्ड पोर्नोग्राफी बनवणे, संकलित करणे, त्या अपलोड करणे हा देखील गुन्हा आहे. आणि या प्रकरणात पहिल्यांदा गुन्हा सिद्ध झाल्यास ५ वर्षांपर्यंत शिक्षा आणि दहा लाखांपर्यंत दंड, दुसऱ्यांदा गुन्हा झाल्यास ७ वर्षांपर्यंत शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड आहे. असे असूनही चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणे मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही आहेत. परदेशात इंटरनेटवर चाईल्ड पोर्नोग्राफी सर्च केल्यासही कठोर शिक्षा केली जाते. तशाच प्रकारे भारतात देखील कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे. तसेच पालकांनी देखील आपल्या मुलांची काळजी घेणे, त्यांच्याकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here