महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..

0
12

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचा 3 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

मागील तीन महिन्यांपासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा 3 टक्के महागाई भत्ता रखडलेला आहे. जो आता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

जुलै ते डिसेंबर 2021 पर्यंतचा महागाई भत्ता मधील फरक देखील शासकीय कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. यामुळे राज्य शासकीय कर्मचारी वर्गासाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

कोविडच्या कारणाने सर्वच स्तरावरची आर्थिक स्थिती डळमळीत केली होती. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन, महागाई भत्ता देखील रखडला होता. मात्र आता शासकीय कर्मचारी वर्गाला त्यांचा रखडलेला महागाई भत्ता देखील मिळणार असल्याने दिलासा मिळणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here