महाराष्ट्राच्या ‘माईला’ कला शिक्षकाची अनोखी श्रद्धांजली

0
30

देवळा प्रतिनिधी : रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटेची वाट पहा एक दिवस तुमचाही दिवस उजाडेल असे सतत युवकांना प्रेरणा देणारी अनाथांची माय पद्मश्री थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

यानिमित्ताने देवळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने प्राचार्य हितेंद्र आहेर, उपप्राचार्या डॉ. मालती आहेर मुख्याध्यापिका ,प्रतिभा सागर, मुख्याध्यापक दिलीप आहेर, पर्यवेक्षक ठोके सर, आहेर सर, सर्व शिक्षक-शिक्षिका ,विद्यार्थी, विद्यार्थीनी च्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.

विद्यालयाच्या दर्शनी फलकावर कलाशिक्षक भारत पवार यांनी रंगीत खडूच्या सहाय्याने कै.सिंधुताई सपकाळ यांचे चित्र रेखाटून आदरांजली अर्पण केली.

हजारो लेकरं आज पुन्हा एकदा अनाथ झाली..
अनाथांची माऊली अनंतात विलीन झाली….
माईंना भावपूर्ण श्रद्धांजली 💐


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here