द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; दक्षिण आफ्रिकेत सध्या कोरोनाच्या नव्या घातक प्रकाराचे रुग्ण आढळत आहेत. आणि आफ्रिकेतूनच महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराला मायक्रोन असे नाव देण्यात आले आहे.
आफ्रिकेत या प्रकारचे दिवसागणिक वाढत चालले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगभराची देखील चिंता वाढत चालली आहे.
यामुळेच भारतात देखील यासाठी काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
तर महाराष्ट्रात या नव्या प्रकारच्या पार्श्वभूमीवर नव्या गाईड लाईन्स देण्यात आल्या आहेत.
नुकत्याच दक्षिण आफ्रिका येथून डोंबिवली येथे आलेल्या एका प्रवाशाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मात्र या रुग्णास नव्या मायक्रोन या कोरोनाच्या प्रकारची लागण झाली आहे का? याची तपासणी केली जात आहे.
आत्ता कुठे परिस्थिती पूर्व पदावर येत असल्याचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सर्व काही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत आहे.
तर शाळा देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र आता प्रशासन या कोरोनाच्या नव्या प्रकाराने खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे शाळांबाबत देखील प्रशासन अजून काही निर्णय घेण्याची शक्यता आहे.
आता या दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशाचे अहवाल काय सांगतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपूर्ण जगभर कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी निर्बंध लादले जात आहेत. काही ठिकाणी तर पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आले आहे.
याच कारणास्तव भारतात देखील सावधगिरी म्हणून नवीन सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
भारतात आत्ता कुठे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. आणि आता नेमके या नव्या कोरोनाच्या प्रकाराने धाबे दणाणले आहे.
आता प्रशासन यावर काय नवीन निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचलीत का?
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे एका चार वर्षांच्या लहानग्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
या घटनेतील संबंधित विकृत हा त्या लहानग्या मुलीचा नातेवाईक असल्याचं सांगण्यात येत आहे.
चाळीसगाव येथील आनंदवाडी भागात हा संतापजनक प्रकार घडला आहे.
देशात मागच्या काही काळात अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
या घटना अजून ही थांबलेल्या नाहीत. यामुळे देशभर नागरिकांमध्ये संतापजनक वातावरण आहे.
पुरुष आणि स्त्री या दोन घटकांमध्ये स्त्री ला केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहणाऱ्या विकृत प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्याचे दिसून येत आहे.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम