महागाईने पुन्हा एकदा खिशाला कात्री ! गॅस सिलिंडर दरात पुन्हा एकदा वाढ

0
10

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : महागाईने सर्व सामान्य माणसाला कोलमडून ठेवले असतानाच गुरुवारी सकाळी आणखी एक झटका दिला आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. घरगुती सिलेंडर चे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. त्याचसोबतच व्यावसायिक कारणासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरची दर देखील वाढली आहेत. १४ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किंमतीत ३.५० रुपयांनी वाढ झाली आहे.

आजपासून म्हणजेच १९ मे पासून दिल्लीमध्ये १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत १ हजार ३ रुपये, मुंबईमध्ये १ हजार २ रुपये ५० पैसे, कोलकातात १ हजार २९ रुपये, तर चेन्नईमध्ये १ हजार १८ रुपये ५० पैसे इतकी झाली आहे. या महिन्यातील घरगुती सिलेंडरची किंमतीत वाढ होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी ७ मे रोजी सिलेंडरची किंमत ५० रुपयांनी वाढवण्यात आली होती. घरगुती सिलेंडर बरोबरच १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर देखील महाग झाला आहे. त्याच्या किंमतीत ८ रुपयांनी वाढ करण्यात आली ८ असून यामुळे दिल्लीत त्याची किंमत २ हजार ३५४, मुंबईत २ हजार ३०६, कोलकातामध्ये २ हजार ४५४ आणि चेन्नईत २ हजार ५०७ रुपये इतकी झाली आहे.

आजच्या दरवाढीमुळे संपूर्ण देशात १४.२ किलोचा घरगुती सिलेंडरच्या किंमतीने १ हजारचा पल्ला पार केला आहे. एक वर्षाआधी दिल्लीतील घरगुती सिलेंडरची किंमत ८०९ होती. २२ मार्च रोजी त्याच्या किंमती ५० रुपयांनी वाढल्या होत्या. मात्र एप्रिल महिन्यात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. परंतु मे महिन्यात सात तारखेला ५० रुपयांची वाढ झाल्यानंतर सिलेंडरच्या किंमतीने १ हजारच्या टप्पा पार केला होता. आजच्या वाढीसह देशभरात किंमती १ हजारच्या पुढे गेल्या आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here