महत्वपूर्ण निर्णय! आजपासून येथे मांस-मच्छि विक्री कायमस्वरूपी बंद

0
22

द पॉईंट नाऊ ब्युरो : देहू हे एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. संत तुकाराम महाराजांची नगरी म्हणून देहूची ओळख आहे. याच कारणाने आता देहू नगरपंचायतीने देहू मध्ये मांस, मच्छि विक्रीस बंदी घातली आहे.

संत तुकाराम महाराज यांनी आपल्या सत्कर्माने समाजाचे विशेष मार्गदर्शन केले. आज वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव समाजावर आहे. आजही मोठ्या संख्येने वारकरी देहू, आळंदी, पंढरपूर येथे भक्तिभावाने भेट देतात.

याच कारणास्तव संत तुकाराम महाराजांच्या देहू मध्ये आता नवनिर्मित देहू नगरपंचायतीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत मांस, मच्छि विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव जानेवारी महिन्यात मांडण्यात आला होता. त्या ठरावाच्या मंजुरीप्रमाणे आता 1 एप्रिल पासून देहूमध्ये मांस, मच्छि विक्रीस आता पूर्णपणे बंदी असेल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here