‘मला माफ करा’ अभिनेत्याने मागितली चाहत्यांचे माफी

0
10

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमार वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असतो. चित्रपट विश्वातील सर्वात शिस्तबद्ध अभिनेता अशीच त्याची ओळख असून आरोग्याबाबत नेहमी फिट अॅण्ड फाईन आहे. सध्‍या अक्षय कुमारची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून एटिव्हीवर अभिनेता अजय देवगण व शाहरुख खान यांच्यासोबत अक्षय कुमार देखील ‘बोलो जुबा केसरी’ जाहीरातमध्ये दिसला. पान मसाल्‍याच्‍या जाहिरातीमध्‍ये काम केल्‍याने तो चर्चेत आला आहे. या जाहिरातीमध्‍ये दिसल्‍याने तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. चाहत्‍यांना अक्षयची ही जाहिरात आवडलेली नाही.

हिरोगीरी सिगारेट फुंकण्यात नाही..’ असं सांगणारा अक्षय कुमार हा पान मसाल्याची जाहिरात करीत असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. या पान मसाला जाहिरातीवरुन ट्रोल होत असल्‍याने अक्षय कुमारने आपल्‍या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक पोस्‍ट शेअर केली आहे. त्‍याने आपल्‍या चाहत्‍यांची माफी मागितली असून, संबंधित पान मसालाचा ब्रँड अँबेसिडर राहणार नसल्‍याचे त्‍याने म्‍हटलं आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here