मराठी नवीन वर्षात कसा असेल आपला दिवस वाचा राशी भविष्य 2 एप्रिल

0
8

मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope : गोड बोलून कामं पूर्ण करून घेणे हिताचे. रागाला आवर घालणे लाभाचे. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून कामांचे नियोजन करणे फायद्याचे. वाद टाळणे सोयीचे. स्वतःला बदला जग बदलेल हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. शुभ रंग – किरमिजी

वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope : प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा. परिस्थितीशी जुळवून घेणे फायद्याचे. वास्तवाचे भान राखून व्यावहारिक निर्णय हिताचे. प्रगतीवर लक्ष केंद्रीत करणे सोयीचे. अडचणी दूर होतील आणि अनेकांची मदत लाभेल. इतरांवर प्रभाव पाडाल. शुभ रंग – निळा

मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope : नियम कायदे पाळणे हिताचे. कायदेशीर प्रश्न सुटतील. क्षमतेचे भान राखणे आणि व्यावहारिक राहणे सोयीचे. हिशेबी वृत्ती फायद्याची. विरोधकांना नामोहरम कराल. वाद टाळणे लाभाचे. शुभ रंग – हिरवा

कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope : क्षमता ओळखून नियोजन करणे हिताचे. वास्तवाचे भान राखून व्यवहार जपणे फायद्याचे. परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. जबाबदाऱ्या चोख पार पाडाल. व्यस्त राहाल. इतरांकडून अपेक्षा बाळगणे सोडा. कोणालाही शब्द देणे किंवा जामीन देणे टाळा. अतिरेक टाळा. शुभ रंग – चंदेरी

सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope : अती घाई संकटाकडे नेई हे लक्षात ठेवा. महत्त्वाचे निर्णय पुढल्या आठवड्यावर ढकला. कायदेशीर गुंते सोडविण्यासाठी वेळ मागून घेणे सोयीचे. अतिरेक टाळणे आणि संयमाने वागणे हिताचे. कष्ट वाढतील. वाद टाळणे फायद्याचे. पडेल ती जबाबदारी नियोजन करून पार पाडा. शुभ रंग – नारिंगी

कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope : ओळखीतल्यांसोबत वेळ मजेत जाईल. खर्च वाढेल. ज्येष्ठांचे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभेल. वाद टाळणे हिताचे. जबाबदाऱ्यांना प्राधान्य देणे लाभाचे. परिस्थितीशी जुळवून घ्या. वरिष्ठांशी जुळवून घ्या. शुभ रंग – मोरपिशी

तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope : वाद टाळणे, नियोजन करून काम करणे फायद्याचे. परिस्थितीशी जळवून घेणे, सामंजस्य दाखणे हिताचे. कायदे नियम पाळा. शुभ रंग – आकाशी

वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope : आर्थिक प्रश्न सुटतील. प्रिय व्यक्तींची साथ मिळेल. ओळखीतल्यांची मदत मिळेल. सामंजस्याने प्रश्न सुटतील. सत्यवचनी राहणे हिताचे. शुभ रंग – गुलाबी

धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope : महत्त्वाकांक्षी आहात. स्वप्न पूर्तता करू शकाल. स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचा आनंद शोधाल. वाद टाळा. व्यवहारात नियम कायदे पाळा. शुभ रंग – सोनेरी

मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope : आर्थिक प्रश्न सुटतील. प्रगती होईल. आनंद, सुख यांची अनुभुती मिळेल. आपला प्रभाव वाढेल. नियम कायदे पाळणे आणि वाद टाळणे हिताचे. शुभ रंग – जांभळा

कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope : ओळखीतल्यांची साथ लाभेल. अडलेली कामं होतील. आर्थिक लाभ होईल आणि प्रगती होईल. आधी खर्च वाढेल नंतर उत्पन्न वाढेल. प्रवास घडेल. नियम कायदे पाळणे हिताचे. नियोजन लाभाचे. शुभ रंग – जांभळा

मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope : वेळ पाळणे, नियोजन करणे, वाद टाळणे हिताचे. प्रगती होईल. समाजकार्य आणि धार्मिक कार्य घडेल. वास्तवाचे भान राखणे आणि व्यवहार जपणे हिताचे. सामंजस्य फायद्याचे. कामं वेगाने पूर्ण कराल. इतरांवर प्रभाव टाकाल. शुभ रंग – सोनेरी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here