देविदास बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; मरळगोई खु.ता निफाड येथील महिला सरपंचाने राहत्या घरी विषारी औषध सेवन केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी(दि.२२)रात्री घडली. मरळगोई खुर्द ग्रामपंचायतच्या विद्यमान महिला सरपंच योगीता अनिल फापाळे यांनी मंगळवारी त्यांच्या राहत्या घरी रात्री साडे आठच्या दरम्यान विषारी औषध सेवन केले.
त्यांचे पती अनिल फापाळे यांनी उपचारासाठी लासलगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉ खुशाल जाधव यांनी तपासणी दरम्यान सदर महिलेस मृत घोषित केले.
संतोष शांताराम गवळी रा. मकरंदपूर ता.कन्नड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरपंच झाल्या पासून माझ्या बहिणीस तिच्या सासरचे कोणत्याही कारणावरून व तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करत होते.योगिता ने सासरच्या या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याच्या तक्रारीवरून पती अनिल बाबासाहेब फापाळे,सासरे बाबासाहेब फापाळे,सासु सरला फापाळे आणि दिर प्रदीप फापाळे सर्व राहणार मरळगोइ खुर्द यां चौघांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात भादवी ३०६,३२३,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल केली आहे.याप्रकरणी तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे करत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम