द पॉईंट नाऊ विशेष : मधू म्हणजे मध, मक्षिका म्हणजे माशी.
मध-हे संपूर्ण अन्न आहे. मध हे आपल्या रक्तात सहजपणे शोषले जाते. पुराणकाळापासून आयुर्वेदामध्ये मधाचे महत्व सांगितले गेले आहे. बऱ्याच वेळा आयुर्वेदिक औषधे मधासोबत घेतली जातात. त्यामुळे औषधांचे चांगले परिणाम मिळतात.
मधमाशांनी खूप मेहनतीने बनवलेल्या मधावर डल्ला मारणं हे चुकीचं आहे. मधमाशा आपल्याला चावताना त्यांचा नाहक बळी जातो. मध काढताना असंख्य मधमाश्या मरतात. त्यांची अंडी नष्ट होतात.
किती पाप लागतं ना आपल्याला..
मध काढण्याची एक अशी शास्त्रीय पद्धत आहे ज्यामध्ये ना पोळ नष्ट होत ना त्यात मधमाशीची अंडी नष्ट होतात.
आपण जर मधुमक्षिका पालन केले तर आपल्याला दुहेरी फायदा आहे.मधासोबतच पिकांचं उत्पादन पण वाढेल. शेतीला जोडधंदा म्हणून मधूमक्षिका पालन सर्वोत्तम आहे. सरकारकडून यासाठी training आणि सबसिडी पण उपलब्ध आहे.
मधमाशांच्या मुख्य 4 प्रजाती आपल्याकडे आढळतात. एपीस मेलिफेरा,एपीस फ्लोरिया, एपीस सेरेना इंडिका ह्या प्रजाती आपण मधुमक्षिका पालनसाठी उत्तम आहेत.
– गिरीश सावळा (Mircobiologist)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम