देवळा प्रतिनिधी : देवळा येथील मधुकर पांडुरंग मेतकर पतसंस्थेस ३१ मार्च २०२२ अखेर सर्व प्रकारच्या तरतुदी वजा जाता २२ लाख ९ हजार ४५९ रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मेतकर ,चेअरमन अजय मेतकर यांनी दिली .
संस्थेकडे दि ३१मार्च अखेर ४ कोटी ४८ लाखाच्या ठेवी जमा असून ३ कोटी ८ लाखाचे कर्ज वाटप केलेले आहे.संस्थेचे वसूल भागभांडवल १ कोटी ४ लाखाचे असून विविध प्रकारचा निधी ९४ लाख जमा झालेला आहे . संस्थेने विविध वित्तीय संस्थांमध्ये २ कोटी २० लाखाची सुरक्षित गुंतवणूक केलेली आहे .संस्थेचे खेळते भाग भांडवल ६ कोटी ७८ लाखाचे असून सीडी रेशो चे प्रमाण ६७. ६५ टक्के आहे .५८१ सभासद संख्या असलेल्या पतसंस्थेचे थकबाकीचे प्रमाण ५. ३४ टक्के आहे. संस्थेने कर्जाच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासले असून , सामाजिक कार्यात देखील संस्था अग्रेसर आहे .
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन अजय मेतकर ,व्हा चेअरमन विष्णू जाधव ,संचालक राजेश मेतकर ,संतोष शिंदे ,संदीप बागुल ,आनंदा सोनवणे ,विठ्ठल कोठावदे ,संजय शिवदे ,इंदुमती मेतकर ,वैशाली शेवाळकर ,गौरव मेतकर ,व्यवस्थापक के एम देवरे ,सचिव संदीप देवरे ,भूषण शिरसाठ ,ज्ञानेश्वर मेतकर ,संदीप भामरे आदी मान्यवर उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम