मतदार याद्यांमध्ये बनावट नावांचा सुळसुळाट ; सेनेचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी

0
19

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. नवीन मतदार याद्यांमध्ये बनावट नावे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांमध्ये विधानसभेच्या नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि नाशिक पूर्व मतदार संघात एकुण दोन लाख 87 हजार 493 दुबार मतदार असून ते मतदार याद्यांमधून वगळावेत अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यात सेनेतर्फे पुरावे देखील सादर केले आहेत.

सर्वाधिक दुबार मतदार नाशिक पश्चिममध्ये एक लाख 22 हजार 242 इतके असून नाशिक पूर्व आणि नाशिक मध्य मतदार संघात ही संख्या अनुक्रमे 88 हजार 932 आणि 76 हजार 319 इतकी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेली जिल्ह्यातील इतर मतदार संघातील दुबार मतदारांची संख्या मतदार संघनिहाय पुढील प्रमाणे नांदगाव (12117)मालेगाव (4507),मालेगाव बाह्य (11716), सिन्नर (8398), बागलाण (12354), निफाड (9883), दिंडोरी (8624), नाशिक पूर्व(12357),नाशिक मध्य(12347) तर इगतपुरी 5353.

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात असलेली जिल्ह्यातील इतर मतदार संघातील दुबार मतदारांची संख्या मतदार संघ निहाय पुढीलप्रमाणे नांदगाव (7886), मालेगाव मध्य(655),मालेगाव बाह्य (8213), बागलाण(7195),सिन्नर(6776), निफाड (9195), दिंडोरी(8483),नाशिक पूर्व(8599),नाशिक मध्य (8970), नाशिक पश्चिम(10251), देवळाली(8478) तर इगतपुरी(4031).

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात असलेले जिल्ह्यातील इतर मतदार संघातील दुबार मतदारांची संख्या मतदारसंघनिहाय पुढील प्रमाणे नांदगाव(6573), मालेगाव मध्य(2232), मालेगाव बाह्य(6674), बागलाण(5128), सिन्नर(4530), दिंडोरी(4791), नाशिक पूर्व (9142), नाशिक मध्य(12242), नाशिक पश्चिम(10724), देवळाली(5088) आणि इगतपुरी 2943.

जिल्हाधिकारी मांढरे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात उपनेते आणि माजीमंत्री बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल, दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे आदींचा समावेश होता. दुबार नावांची पडताळणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी या शिष्टमंडळास दिले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here