मतदार यादीत डबल नाव असेल तर तुमच्यावर होणार कारवाई

0
35

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; गेल्या काही दिवसांपासून बनावट मतदार यादींचे प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यातील निवडणुका तोंडावर आल्या असताना मतदार यादीमध्ये १ लाख २२ हजार दुबार मतदार असल्याचा दावा शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांकडून जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांच्याकडे करण्यात आला होता.

राज्यभर नाशिकच्या मतदार यादींचा विषय चांगलाच गाजला दरम्यान, याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी मांढरे यांनी तत्काळ निवडणूक अधिकारी (Election Officer) आणि कर्मचाऱ्यांना दुबार नावे वगळण्याच्या सूचना केल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांनाही सल्ला दिला असून याबाबतची शहनिशा करून दुबार नावे असतील तर ती वगळून घ्यावयाची आहेत. येणाऱ्या निवडणुकीत जर कुणी दुसऱ्यांदा मतदान करताना दिसून आला तर त्यावर कडक कारवाई केली जाईल असाही इशारा जिल्हाधिकारी मांढरे यांनी एका व्हिडीओ द्वारे केला आहे. यामुळे नागरिकांनी आपल्या या सर्व प्रकारची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here