मतदानानंतर उमेदवारांची मतदारांकडे पाठ ; एकमेव उमेदवार आभाराला दारोदार

0
38

देवळा प्रतिनिधी : देवळा नगरपंचायत निवडणूक शांततेत पार पडली, सर्व उमेदवारांनी आपल्या ताकदीनिशी प्रचार करत राळ उठवली , मतदानाआधी मतदारांच्या पाया पडणारे उमेदवार मतदानानंतर मात्र अश्विनी आहेर वगळता कुठल्याही उमेदवार मतदारांचे आभार मानायला गेले नाहीत.

गरज सरो अन वैद्य मरो ह्या म्हणी प्रमाणे उमेदवार या लोकशाहीत वागत असतील तर ते अतिशय दुर्दैवी आहे, उमेदवार मतदारांचे आभार मानायला कदाचित विजयी झाल्यानंतर जातीलही पण यांची बांधिलकी स्वार्थापुर्ती असेल तर या लोकशाहीत मतदारांना गृहीत धरून विकास हा नक्कीच बाधक असणार आहे.

अनेक उमेदवार कट्ट्यावर आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोणी किती मतदान केले, कोणाला केले, कोण फुटले , कोणाला पैसे दिले, हे आडाखे बांधण्यात व्यस्त आहेत, मात्र मतदार या लोकशाहीच्या उत्सवास सहभागी झालेत त्यांचे धन्यवाद म्हणावे म्हणून कोणीही वॉर्डात फिरकत नाहीत. हे स्वार्थीलक्षण उमेदवारांनी दूर सारले पाहिजे.

पैसे वाटून निवडुन येऊ शकतात मात्र जे आत्मिक समाधान असायला हवं ते कदाचित ठराविक उमेदवारांच्या नशिबी असेल. भ्रष्टाचाराने बरबटलेले उमेदवार पैशावर फुशारक्या मारणार असतील तर ते दुर्दैवी आहे. आम्ही बाहेरचे मतदार विकत घेतले , स्थानिक घेतले, या समाजाला इतके पैसे दिले हे फुशारक्या मारण्याचे किंवा कौतुकाने मिरवण्याचे द्योतक नाही लोकशाही बदनाम करण्याचे पातक काही लोकशाहीचे नामधारी पूजक घेताय.

शिवसंग्रामच्या एकमेव उमेदवार अश्विनी आहेर यांनी सभांच्या माध्यमातून मैदान तर गाजवले निकाल काय लागेल याची आकडेमोड न करता बसता दोन दिवसात प्रत्येक मतदाराला भेटून मतदान केलं म्हणून त्यांनी आभार मानले, कोणाला मतदान केले हे महत्त्वाचे नाही मात्र मतदान केलं म्हणून आभार मानायला आलोत हे सांगत घरोघरी भेट दिल्या, बाकी वॉर्डात आमच्या टीमने माहिती घेतली असता कुठल्याही उमेदवाराने घरोघरी भेटी दिलेल्या नाहीत. फक्त कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोणी कुणाला मतदान केलं इतकाच कानोसा घेण्याचा प्रयत्न उमेदवार करताय.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here