मटाने नगरीत अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

0
13

प्रविण आहेर प्रतिनिधी : तालुक्यातील मटाने येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत कार्यालय, माध्यमिक शाळा, जि.प. शाळा येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सुरेखा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, रुकममोती माध्यमिक विद्यालय येथे पत्रकार प्रविण आहेर यांनी प्रतिमापूजन करून ज्येष्ठ नागरिक कारभारी आहेर यांनी ध्वजारोहण केले तर जि.प. शाळेत उपसरपंच भाऊसाहेब आहेर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी राष्ट्रगीत प्रतिज्ञा ध्वजगीत विद्यार्थिनींनी तालासुरात सादर केले. आत्मनिर्भय भारत या संकल्पनेतून विविध उद्दिष्टे पूर्तीची, स्वातंत्र्यसंग्रामातील बलिदान दिलेल्या वीर सुपुत्रांना आज आपण नतमस्तक होऊन मानवंदना दिली. सीमेवरील जवानांना, कोरोना योद्ध्यांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव मुख्याध्यापक बी एम सावंत यांनी केला.

याप्रसंगी सरपंच सुरेखा पवार, उपसरपंच भाऊसाहेब आहेर, ग्रामसेवक अनिल आहेर, समुदाय आरोग्य अधिकारी तिलोत्तमा देवरे, आरोग्य सेविका एस.एन.भामरे, आरोग्यसेवक शिवाजी सोनवणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here