कळवण प्रतिनिधी : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना धक्का बसला असून त्यांचे दीर राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार (ncp mla nitin pawar) यांच्यात सरळ लढत झाली. कळवण नगरपंचायतीमध्ये होती. दोघांचीही प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागली होती. यात दिर वरचढ ठरले असून मंत्री पवार यांना धक्का मानला जातोय.
१७ जागांचे निकाल हाती आले असून राष्ट्रवादीने ९ जागांवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. त्यामुळे आमदार नितीन पवार यांची पुन्हा एकदा सरशी झाली आहे. कौतिक पगार यांची पुन्हा एकदा सत्ता कळवण नगर पंचायतीवर सत्ता आल्याने जल्लोष साजरा होत आहे.
राष्ट्रवादीसह कळवण नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला दोन तर कॉंग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत. भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर मनसेनेला १ जागा याठिकाणी मिळाली आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम