द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत रात्री वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विकल्यावर त्यांचे पैसे वेळेवर मिळावेत, या उद्देशाने राज्य सरकारने कापूस पणन महासंघाच्या कर्जास आता शासन हमी लागू करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय.
पुण्यात आता साखर संग्रहालय उभारलं जाणार आहे. तसेच गाळप हंगामाकरता साखर कारखान्याच्या अल्पमुदत कर्जास शासनाची थक हमी देण्याचा देखील निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
मागासवर्गीय जागांच्या एकत्रित आरक्षण ग्रामपंचायत अधिनियमातील सुधारणा प्रस्ताव पुनर्विचारासाठी सादर केला जाणार आहे.
सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तर महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यासाठी अध्यादेश काढला जाणार आहे.
असे अनेक निर्णय राज्य सरकारच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम