आज ‘द पॉईंट नाऊ’चा दिवाळी अंक प्रकाशन

0
162

द पॉईंट नाऊ विशेष ; कमी कालावधीत जनमानसात वित्तम बातमी पोहचवणारे आघाडीचे निर्भीड ‘न्यूज वेबपोर्टल’ ने पहिलाच दिवाळी अंक प्रसिद्ध केला आहे. वाचकांना वैचारिक साहित्याची मेजवानी यात अनुभवायला मिळणार आहे.

या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संपादक मंडळातर्फे  करण्यात आले आहे. या दिवाळी अंकाचे प्रकाशन आज मंगळवार (दि.2) रोजी दिमाखात पार पडणार आहे. या सोहळ्यात दिगग्जांची उपस्थिती असणार आहे, कळवण विभागाचे पोलीस उपअधीक्षक मा. अमोल गायकवाड यांच्या हस्ते तर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष केदा (नाना) आहेर, शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर, यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे , यावेळी देवळा नगरपंचायतीचे मा. गटनेते जितेंद्र आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, युवा नेते किशोर आहेर, हॉटेल शामियानाचे संचालक देशमुख, कॉन्ट्रॅक्टर महेंद्र पाटील, सचिन आहेर, अमोल सोनवणे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रम देवळा बाजार समितीच्या सभागृहात पार पडणार असून सूत्रसंचालन देवळा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी श्वेता शिंदे, मिताली जाधव व मानसी जाधव करणार आहेत. या कार्यक्रमासाठी पत्रकार सोमनाथ जगताप परिश्रम घेत आहेत.

या दिवाळी अंकात अभिनेते महेश कोठारे, अभिनेत्री केतकी माटेगावकर, सनदी अधिकारी प्रताप दिघावकर, लक्ष्मीकांत देशमुख अशा अनेक दिगगजांचे विचार या अंकात प्रकट करण्यात आले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here