भ्रष्टाचाऱ्यांनो हे खूप अति होतंय; आता इथेही घोटाळा

0
40

द पॉईंट नाऊ ब्युरो : नागरिकांना स्वस्त धान्य मिळावे यासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या स्वस्त धान्याचाही काळाबाजार करण्यात आल्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. पोलिसांनी तब्बल 7 लाखांचा तांदूळ जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्याच्या ब्रह्मगाव भागात एका ठिकाणी स्वस्त धान्य दुकानातील 550 हुन अधिक पोती तांदळाचा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी संबंधित पत्र्याच्या शेडवर छापा टाकला असता, 550 हुन अधिक तांदळाची पोती आणि मालवाहू वाहन असा सुमारे 32 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

नागरिकांना स्वस्त धान्य उपलब्ध व्हावे, कोणीही उपाशी राहू नये या उद्देशाने शासन शासकीय स्वस्त धान्य दुकान चालवते. मात्र भ्रष्टाचाराच्या आहारी गेलेल्या लोकांचे पोट मात्र इथेही रिकामेच होते की काय, म्हणून इथेही भ्रष्टाचार केलाच. या प्रकरणात पोलिसांनी तिघा जनांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here