भ्रमंती ग्रुप, तर्फे किल्ले चांदवड येथे दुर्गाभ्यास व श्रमदान मोहिम

0
69

चांदवड प्रतिनिधी : रविवार दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी श्री छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भ्रमंती ग्रुप, नाशिक तर्फे किल्ले चांदवड येथे दुर्गाभ्यास व श्रमदान मोहिम राबविली आली, त्यात गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी 50 फूट अवघड अश्या कातळ टप्प्यावर कायमस्वरूपी मजबूत दोर (रोप) लावण्याचे काम करण्यात आले, तसेच किल्यावर ध्वज स्तंभ उभारुन ऐतिहासिक कातळ शिल्पांचे संवर्धन करण्यात आले.

किल्यावर स्वच्छता अभियान राबवत भ्रमंती ग्रुपच्या श्री पुष्पक निकम यांनी किल्ल्याची ऐतिहासिक माहिती व गड संवर्धनाचे महत्व सहभागी दुर्गप्रेमींना सांगीतले, यासाठी भ्रमंती ग्रुप,नाशिक चे श्री.महेश जाधव व श्री. पुष्पक निकम सर यांचे सहकारी पंकज बच्छाव, प्रविण साळुंखे, बाबा देवरे, मधुरा देसले यांच्या सोबत चांदवड ट्रेकर्स ग्रुप चे श्री सचिन राऊत, डॉ.जी.डी शिंदे, श्री प्रकाश सूर्यवंशी,श्री संतोष सोनवणे,श्री.बबन बिन्नर व संजय वानखेडे सर व प्रशांत सुताने सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मालेगाव येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शशिकांत वाव्हळ, डॉ. अविनाश आहेर व डॉ. बोरा व त्यांचे सहकारी यांनी श्रमदान मोहिमेत सहभागी होत नव्या पिढीला प्रोत्साहन दिले.

या सर्व ट्रेकर्स परीवाराने किल्यावर श्रमदान करून श्री छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली व भविष्यात पुन्हा चांदवड गडावर मोहीम आयोजित करत गड संवर्धनासाठी दुर्ग प्रेमी, इतिहास अभ्यासकांना सहभागी होण्याचे आव्हान केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here