भोगी योगित ला फरक कळतो का ? दीपाली सय्यद

0
201

मशिदींवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. अशातच मराठी चित्रपट सृष्टीच्या अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

माजी मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला दीपाली सय्यद यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से !” अशा शब्दात ट्वीट करत अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री दीपाली सय्यद म्हणाल्या की, ‘योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं. देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार आहेत का?’ भोगी आणि योगी तला फरक अमृता फडणवीस यांना कळतो का? अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगी सरकारचं कौतुक केलं होतं. तसेच महाराष्ट्रात सत्तेचे भोगी आहेत, असं म्हणत ठाकरे सरकारला सणसणीत टोलाही लगावला होता.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here