भेटी लागी जिवा ; १९९३ सालंची पून्हा भरली शाळा

0
39

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; जनता विद्यालय आघार बु.येथील सन १९९३ सालच्या इ.१० वीच्या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थींनीचे स्नेहसंमेलन मा.साधान दादा हिरे यांच्या प्रयत्नातुन मोरगण मिल्क ॲन्ड डेअरी इं.येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमाला त्यावेळेचे बिजगणीताचे शिक्षक मा.चव्हाण सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरूवात शाळेच्या परिपाठ प्रार्थनेने झाली.

शाळेतील दिवंगत विद्यार्थ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी चव्हाण सरांनी सगळ्यांची हजेरी घेतली,जमलेल्या प्रत्येकाने आपल्या शालेय जिवनातील आठवणी आपल्या मनोगतातुन व्यक्त केल्या,तेव्हा बालपणीच्या भावना दाटून आल्या होत्या. तब्बल २८ वर्षां पुर्वीच्या आठवणींना यावेळी उजाळा मिळाला.

सदर कार्यक्रमाक समाधान दादा हिरे, सतीष सोनवणे, साजीद पिंजारी, विरेंद्र सोनवणे, दिपक हिरे, पप्पू पवार, महादू सूर्यवंशी, समाधान पगार, नाना पवार, शांताराम सावंत, सागर पवार,वैशाली आहेर, ममता कोठारी, ज्योती बच्छाव, यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिता हिरे, लियाकत मन्सुरी यांनी अथक परिश्रम घेतले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

समाधान दादा हिरे यांच्या मोरगण परिवारातर्फे भेटवस्तू देण्यात आल्या तसेच जेवणाचा आस्वादही या मित्रमेळ्याने लुटला


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here