भुजबळांना ‘क्लीनचिट’ सर्वत्र जल्लोष ; देवळा तालुक्यात राष्ट्रवादी मात्र जल्लोषा पासून दूर ?

1
9

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायालयाने भुजबळ यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) गैरव्यवहार प्रकरणात क्लिनचिट दिली आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहाराच्या आरोपातून भुजबळ मुक्त झाले असून, या प्रकरणातून त्यांचे नाव वगळण्यात आले आहे यामुळे सर्वत्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.

देवळा तालुक्यात देखील जल्लोष करण्यात आला मात्र या जल्लोषात ‘राष्ट्रवादी’ नव्हती तर ‘शिवसंग्राम’ संघटनेचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर हे होते. यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी भुजबळांच्या आनंदात सहभागी नाही का असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे. तालुक्यात राष्ट्रवादी मजबूत असतांना नेत्यांच्या धरसोड वृत्तीने सध्या पुरती राष्ट्रवादी खिळखिळी झाल्याचे चित्र आहे, भाजपा वगळता तालुक्यात सर्वच पक्षांची दयनीय अवस्था आहे. हे लोकशाही साठी मात्र चिंताजनक आहे.

ना छगन भुजबळ व समीर भुजबळ यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याबद्दल देवळा येथे पेठे वाटून आनंदोत्सव साजरा करतांना उदय कुमार आहेरयोगेश आहेर आबा खैरनार आदी

तालुक्यात दोन जिल्हापरिषद सदस्य , पंचायत समिती देखील राष्ट्रवादीच्या ताब्यात असतांना , जल्लोष साजरा करण्यासाठी मात्र उदयकुमार आहेर यांचा पुढाकार असल्याने नेमकं तालुक्यातील राजकारणात काही घडामोडी होतील का हे बघणं महत्वाचे आहे.

भुजबळ काका पुतणे जेल मध्ये असताना त्यांच्या अटके विरोधात चर्चा घडवून आणण्यासाठी उदयकुमार आहेर यांच्या निवासस्थानी “चाय पे चर्चा ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे उदयकुमार आहेर यांचे भुजबळ प्रेम लपून राहिलेलं नाही. तेव्हा देखील तालुक्यातील राष्ट्रवादी मात्र निश्चित असल्याचे चित्र आहे.

भुजबळांच्या सुटकेसाठी नाशिक मधे काढण्यात आलेल्या मोर्चात देखिल देवळा तालुक्यातून उदयकुमार आहेर यांचा त्यावेळी मोठा सहभाग दिसून आला होता. कोर्टाच्या तारखेला जेल मधून भुजबळांना मुंबईत कोर्टात आणले जायचे त्यावेळी देखिल जिल्ह्यातून जी मोजकी लोक भुजबळांना भेटत असत त्यातही उदयकुमार आहेर यांचा सहभाग असल्याची चर्चा त्यावेळी घडत असे.

मंत्री छगन भुजबळ मा. खासदार समीर भुजबळ
यांची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायदेवतेच्या निर्णयाचे स्वागत देवळा येथील पाचकंदिल चौकात उदयकुमार आहेर यांनी फटाके फोडून व पेढे वाटून केले. यावेळी योगेश आबा आहेर, आबासाहेब खैरनार, मुन्ना अहिरराव, सुरेश बागुल, नईम शेख, मोबिन शेख, राजेंद्र कानडे आदींसह समर्थक उपस्थित होते.

काय आहे प्रकरण…..
याच गैरव्यवहार प्रकरणात भुजबळ यांना दोन वर्षे कारागृहात काढावी लागली होती.

महाराष्ट्र सदन नूतनीकरण कंत्राटामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसून त्याबाबतचा कुठलाही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुरावा आढळलेला नाही, असे निरीक्षण त्यावेळी न्यायालयाने नोंदविले आहे. या खटल्यात आरोपी असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला दोषमुक्ततेचा अर्ज मात्र अद्याप प्रलंबित होता. आज भुजबळांचे नावही या प्रकरणातून वगळण्यात आले आहे.

या गैरव्यवहार प्रकरणातून मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ, तनवीर शेख, इरम शेख, संजय जोशी, गीता जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव गंगाधर मराठे यांचे नावही वगळण्यात आले आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here