भुजबळांच ठरलं ; आगामी निवडणुका महाविकासआघाडी म्हणूनच

1
20

नाशिक प्रतिनिधी : जिल्हा परिषद तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी करूनच लढविल्या जातील. कोणत्याही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जवळ करणार नाही, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली ते नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते.

जिल्ह्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले आहेत. जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष बनवावा असे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी केले.

काही ठिकाणी आघाडी करून निवडणूक लढविण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात आले आहेत, मात्र महाविकास आघाडीच्या वतीनेच निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे जेणेकरून राज्याचा पॅटर्न तळागाळात चालेल असे भुजबळ यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व नगरपंचायत निवडणूकांच्या पूर्व तयारीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार (Adv Ravindra Pagar) यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन नाशिक येथे पार पडली यावेळी ते बोलत होते.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकहिताचे कार्यक्रम राबवावेत असे आवाहन देखी भुजबळ यांनी केले.

यावेळी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक राजकीय स्थितीचा आढावा सादर केला. यावेळी आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, माजी आमदार जयंत जाधव, कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, मुंबई बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, माजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिलाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाट, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, युवती जिल्हाध्यक्ष किशोरी खैरनार, आदी. उपस्थित होते.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here