
देवळा : समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना छगन भुजबळ यांचे हात बळकट करण्यासाठी समता सैनिकांनी येथे आयोजित अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या आढावा बैठकित निर्धार व्यक्त केला .शनिवारी (दि ३०) रोजी देवळा मर्चंट बँक हॉल मध्ये नाशिक जिल्हा पूर्व विभाग नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी यांच्या उपस्थितीत समता परिषदेची आढावा बैठक घेण्यात आली .

सूत्रसंचालन बागुल नाना यांनी केले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष दिलीप सोनवणे व जिल्हा नेते मनोहर( आबा ) खैरनार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष योगेश गोसावी यांनी संस्थापक अध्यक्ष ना. छगनरावजी भुजबळ यांनी समता परिषदेची स्थापना कशासाठी व कोणत्या घटकांसाठी केली त्याची माहिती विषद करून समता परिषदेचा विस्तार गाव तिथे शाखा, घर तेथे समता सैनिक अभियान राबविण्याचा संकल्प सांगितला .
त्याचबरोब ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत तीव्र लढा उभा करण्यासंदर्भात जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे यासाठी ओबीसी मागासवर्गीय भटके विमुक्त जातीतील सर्व घटकांना बरोबर घेऊन समता परिषदेची पुढील वाटचाल करावी अशी सूचना करण्यात आली.
यावेळी विठ्ठल संधान, रघुनाथ आहेर, शशी बागुल, सोनवणे, मिर्झा आदींसह समता सैनिक खंडू अण्णा शेवाळे ,माजी तालुकाध्यक्ष वसंत शेवाळे ,माजी तालुकाध्यक्ष रमेश अहिरे ,राष्ट्रवादी ओबीसी तालुकाध्यक्ष सुरेश जगदाळे ,भटके-विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष साहेबराव सोनजे, माजी समाजकल्याण सभापती उषाताई बच्छाव, महिला आघाडी प्रमुख हेमलता खैरनार, विकास देशमुख, दादा ठाकरे ,विशाल आहेर, महिरे, नामदेव थोरात,केशव खैरनार, वसंत शेवाळे उपस्थित होते . शेवटी संस्थापक अध्यक्ष ना छगनरावजी भुजबळ यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व समता सैनिकांनी निर्धार व्यक्त केला .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम