भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या जवानाचा सन्मान

0
40

देवळा प्रतिनिधी : खामखेडा येथील भुमिपुत्र देविदास नानाजी मोरे यांनी १७ वर्ष भारतीय सैन्यात देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याने त्यांची देवळा शहरातून व खामखेडा गावातून देशभक्तीपर गीतांच्या तालावर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.देवळा नगरपंचायत ,रोटरी क्लब देवळा,खामखेडा ग्रामपंचायत , जनता विध्याल्यय,माजी सैनिक व खामखेडाच्या ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

खामखेडा येथील भुमिपुत्र देविदास नानाजी मोरे हे १७ वर्ष भारतीय सैन्यात देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याने त्यांची सवाद्य मिरवणूक काढली होती.जनता विद्यालय खामखेडा शाळेच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता.भारतीय सैन्यात लान्सनायक म्हणून २००५ मध्ये जळगावला भरती झाले होते.

१७ वर्षाच्या कालावधीत आसाम,दिल्ली,अरुणाचल प्रदेश, झाशी, जम्मू काश्मीर, अंबाला, सियाचीन ग्लेशियर अशा ठिकाणी देशसेवा करून ३० मार्च रोजी ते सिक्कीम येथे सेवानिवृत्त झाल्याने गावी येताना मनमाड जंक्शन येथे कुटुंबीय व मित्रांच्या उपस्थितीत त्यानंतर देवळा येथे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. देवळा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या ठिकाणी देवळा नगर पंचायतच्या वतीने नगराध्यक्षा अनिता आहेर, अशोक आहेर, नगरसेवक अतुल आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब देवळाच्या वतीने अध्यक्ष सुनिल देवरे, प्राचार्य हितेंद्र आहेर, डॉ व्ही एम निकम,डॉ वसंतराव आहेर, प्रा सतीश ठाकरे, अरुण पवार,कौतीक पवार, प्रीतेश ठक्कर, संदीप पगार, संजीव आहेर,सुनील आहेर, संजय पाटील, कैलास बागुल,अक्षय निकम,आदेश ठाकरे यांच्या हस्ते जवानाचा सपत्नीक आई वडिलांच्या उपस्थित सत्कार संपन्न झाला.

 

खामखेडा येथे गावी आल्यावर संपूर्ण गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.घरोघरी सुवासिनींनी औक्षण करत लष्करी जवान देविदास मोरे यांचे स्वागत केले.खामखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच शकुंतला शेवाळे,माजी सरपंच संजय मोरे, बापू शेवाळे,सुनील शेवाळे,प्रभाकर शेवाळे यांनी स्वागत केले. खामखेडा येथील माजी सैनिक जयराम शेवाळे, पंडित पवार ,बाळासाहेब आहेर, कारभारी शेवाळे, संतोष देवरे, संदीप शेवाळे ,रोशन बोरसे, महारु आहेर, शिवाजी शेवाळे यांनी माजी सैनिकांच्या वतीने जवानाचा सत्कार केला.

खामखेडा जनता विध्यालायाच्या वतीने सेवानिवृत्त सैनिक देविदास मोरे व माजी सैनिकांचा मुख्याध्यापक एस टी भामरे, बी वाय सोनवणे यांनी सत्कार केला. यावेळी बळीराम देवरे, रामदास देवरे , चिंतामण आहेर,भास्कर आहेर ,अशोक राणे, संदीप मोरे ,सागर आहेर,दत्तू नवले, शशिकांत चव्हाण, समाधान गुंजाळ,अरुण मगर, दीपक मोरे, शरद शेवाळे,गणेश शेवाळे, कारभारी शेवाळे,अक्षय देवरे, नानाजी मोरे, जिभाऊ मोरे, बाळासाहेब मोरे,भाऊसाहेब मोरे ,संदीप मोरे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. गणेश शेवाळे यांनी आभार मानले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here