सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : भारतीय लोकसत्ताक संघटना मुंबई यांच्या वतीने ६ नोव्हेंबर संविधान दिन व भारतीय लोकसत्ताक संघटनेचा ९ वा वर्धापनदिन या निमित्ताने आयोजित केलेल्या महिलांकरिता राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. गुजरात राज्याचे जॉईंट कमिशनर अरविंद सोनटक्के ,निर्मला निकेतन महाविद्यालयाचे प्राध्यापक समीर मोहिते,भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष अमोलकुमार बोधिराज आदींसह मान्यवर या स्पर्धेच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
भारतीय संविधान जागृती करीता घेण्यात आलेल्या महाराष्ट्रातून महिलांकरिता राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील आदर्श अंगणवाडी सेविका मंगल डोळस यांना प्रथम क्रमांक मिळाला तर दहिसर येथील सुरेखा कांबळे द्वितीय,मुंबई येथील अमृता खेडेकर तृतीय अशी या स्पर्धेतील विजेत्यांची नावे आहेत.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण महान त्यागी करूनावंत माता रमाई भीमराव आंबेडकर जयंतीदिनी भांडुप येथे सर जे जे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ श्वेत कानिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुनील रावत,जेष्ठ साहित्यीक अर्जुन डांगळे, सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक विजय मोहिते या सर्वांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व संविधान पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम